महाड : प्रतिनिधी
चिनी सैन्यासोबत सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या कृत्याचा महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 18) चवदार तळे येथे चीनचा राष्ट्रध्वज आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला.
चिनी सैन्य भारतीय सीमारेषेजवळ घुसखोरी करीत असून आपले जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. चीनविरुद्धच्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले असून, चीनच्याही 40 जवानांना मारण्यात आपल्या जवानांना यश आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सैन्याचे मनोबल वाढवित आहेत. त्यांना साथ देण्यासाठी महाड भाजपचे कार्यकर्ते पुढे सरसावले.
चवदार तळे येथील राम मंदिरासमोर गुरुवारी सकाळी 10:30 वाजता भाजप दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या नेतृत्वाखालील चीनचा राष्ट्रध्वज आणि शी जिनपिंग यांची प्रतिमा जाळून तसेच चीनविरोधी घोषणा देत निषेध करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय सैन्याचा जयजयकार केला गेला.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद गांगण, माजी नगराध्यक्ष संदीप ठोंबरे, महेश शिंदे, चंद्रजीत पालांडे, अप्पा सोंडकर, श्वेता ताडफळे आदी उपस्थित होते.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper