उरण : वार्ताहर
आमदार महेशशेठ बालदी यांच्या ‘’गरजु लोकांना मदत करा” या सुचनेनुसार महेश बालदी मित्र मंडळाचे सदस्य तथा नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर तांडेल यांच्या वतीने उरण तालुक्यातील पाणजे गावातील 200 गरीब गरजू लोकांना बुधवारी (दि. 8) भाजीपाला वाटप
करण्यात आला.
या वेळी माजी सरपंच शेखर तांडेल यांच्यासह पाणजे ग्रामपंचायत सरपंच करिश्मा भोईर, माजी सरपंच मच्छिद्र पाटील ग्रामपंचायत सदस्या नम्रता पाटील, व आशा भोईर, भाजपचे उरण तालुका सदस्य हरेश भोईर, दिलीप भोईर, विजय पाटील, प्रवीण पाटील, कमलाकर भोईर, पुरेश पाटील, हेमंत भोईर, करण पाटील आदी उपस्थित होते. पाणजे ग्रामस्थांकडून नवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर तांडेल यांच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.