Breaking News

चंद्रकांत घरत यांच्याकडून गरजूंना धान्य, पंतप्रधान मदतनिधी

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते चंद्रकांत घरत यांनी मंगळवारी (दि. 7) बोकडवीरा येथील वायू विद्युत केंद्र शेजारील झोपडपट्टीत, तसेच वसाहतीमधील सफाई कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच घरत यांनी पंतप्रधान मदत निधी म्हणून एकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपामध्ये एकूण 45 गरीब गरजू लोकांना प्रत्येकी पाच किलो तांदुळ, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो साखर, दोन किलो बटाटे व कांदे आदी जीवनावश्यक किराणा

सामान देण्यात आले. या वेळी बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच तथा भाजप महिला आघाडीच्या सरचिटणीस मानसी पाटील, तालुका भाजप युवा अध्यक्ष शेखर पाटील, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुचिता पाटील, माजी उपसरपंच देवेंद्र पाटील, कार्यकर्ते गिरीष पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply