मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे पेपरही रद्द करण्यात आले आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …