Breaking News

पत्रकारांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पनवेल : वार्ताहर – सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असले तरी गेल्या 15 दिवसापासून या संदर्भात माहिती घेण्यासाठी महत्वाच्या गोष्टींचे चित्रीकरण करण्यासाठी पत्रकार दिवस रात्र एक करून घराबाहेर आहेत. या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेलमधील सुप्रसिद्ध अशा सामाजिक बांधिलकीमध्ये कार्यरत असणार्या श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व हॅण्डग्लोजचे वाटप करण्यात आले.

पनवेल मिडीया प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम आदींना श्री साई नारायणबाबा संस्थेच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर व हॅण्डग्लोजचे वाटप करण्यासाठी देण्यात आले. यापुढे सुद्धा पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने व हिताच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन या संस्थेकडून देण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply