Breaking News

गरजूंना नाष्ट्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायण बाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने दररोज परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मदत केली जाते. या मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना दररोज सकाळी चांगले दूध व नाष्टा मिळावा यासाठी मंंदिराच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणत्याही प्रकारची गर्दी गडबड न करता सॅनिटायझरचा वापर करून जेवढे सकाळी उपस्थित राहतील तेवढ्यांसाठी दूधासह नाष्ट्याचे मोफत वाटप करण्यात येते. हे दररोज करण्यात येत असून त्याचा फायदा रोज शेकडो जण घेत आहेत. त्याचबरोबर नियमितपणे गरजू लोकांसाठी धान्यवाटप, अन्नवाटप व इतर वैद्यकीय मदतसुद्धा कऱण्यात येत आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply