Breaking News

खालापुरातील सारंग विद्यामंदिरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

चौक : रामप्रहर वृत्त

विद्या प्रसारिणी सभा चौक या संस्थेच्या सारंग (ता. खालापूर) येथील विद्यामंदिर शाळेने दहावी परीक्षा  प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन समारंभ आयोजित केला होता.

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीन हेल्थ किट (गुड नाईट कॉम्बो, कोलगेट,ब्रश, सॅनिटायझर, मास्क, डेटॉल साबण) एक्झाम पॅड, कंपास पेटी यांचे वितरण करण्यात आले.

प्रगती ठोंबरे, सानिया पाटील, वृषाली पाटील, जान्हवी दळवी, तन्वी घोडविंदे, समीक्षा डोंगरे, वेदांत ठोंबरे या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीएसआर प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी आमच्या कंपनीकडून आपणास नेहमीच सहकार्य मिळेल असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा व सचिव योगेंद्र शहा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी या वेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योजना म्हात्रे यांनी केले. माजी विद्यार्थी सचिन दळवी यांच्याकडून पेन तसेच  नववीच्या विद्यार्थ्यांकडून पट्टी, पेन्सिल, खोडरबर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. संदिप सानप यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply