म्हसळा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरसई ग्रामपंचायतीने गुरुवारी खरसई ग्रामपंचायत हद्दीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला व संपूर्ण तालुक्याला आदर्श घालून दिला. त्यामुळे खरसई ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश मांदाडकर, आगरी समाज अध्यक्ष पांडुरंग खोत, मुस्लिम समाज अध्यक्ष इमरान आकलेकर, कोळी समाज अध्यक्ष रामजी भूनेसर, बौध्द समाज अध्यक्ष अनिल कासारे व या सर्वांचे नियोजन करणारे ग्रामसेवक मुरलीधर जाधव, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, प्रा. शिक्षक, माध्यमिक शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जनता कर्फ्यूचा कालावधी स. 7 ते सायं. 7 वाजेपर्यंत होता. यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील डुंगी मोहल्ला, कातळ आळी, मधली आळी, खालची आळी, कोळीवाडा, विद्यानगरी या सर्व भागातीत दुकाने, छोटेमोठे व्यवसाय ग्रामस्थांनी बंद ठेवून सहकार्य केल्याचे सरपंच निलेश मांदाडकर यांनी सांगितले. बंदमध्ये प्रा. शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. जनता कर्फ्यूत अंगणवाडी सेविका अनिता शितकर, नाझनीन फकीर, अनिता मेंदाडकर, मालती शितकर, अंगणवाडी मदतनीस बबिता पेरवी, द्वारका खोत, मनीषा खोत, सुचिता पयेर, विद्या पाटील, आरोग्यसेविका प्रविणा डांगरे, आशा वर्कर निर्मला पयेर, हर्षला शितकर, नीलम पयेर, प्रा. शिक्षक अशोक सानप, संदीप शेवांडे, दाऊद सोलकर, बंदरकर, बालाजी मडावी, माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक मुलाणी, सातपुते, आंबेडकर, भोसले मॅडम, काटे, नितीन पाटील, नारायण पयेर, भास्कर कांबळे, काशिनाथ कोकाटे, गणेश मेंदाडकर आदींनी सक्रिय सहभाग घेतला होता.