Breaking News

गव्हाणच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ सोहळा शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. 17) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या साधना खटावकर-डोईफोडे, उपमुख्याध्यापक प्यारेलालजी शेख, पर्यवेक्षक अरुण घाग, सर्व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply