Breaking News

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर

वेश्वी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आजी सदस्य अजित पाटील, सदस्य विलास पाटील, विंधणे गावचे उद्योजक तथा भाजप उरण तालुका सरचिटणीस प्रसाद पाटील (गंपूशेठ) हे उरणचे आमदार महेश बालदी यांचे समर्थक असून यांच्या प्रयत्नाने उरण ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील वेश्वी कातकरीवाडी येथील सुमारे 80 व विंधणे कातकरीवाडी येथील 123 कातकरी कुटुंबांना गुरुवारी (दि. 16) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात तांदुळ, डाळ, तेल, कांदे, बटाटे, मसाला आदी वस्तू देण्यात आल्या. या वेळी ओएनजीसी प्लान्ट उरणचे प्लान्ट हेड तथा एक्झिक्युटिव्ह  डायरेक्टर नरेंद्र असीजा, ऑल इंडिया एससी, एसटी असोसिएशनचे चेअरमन दिनेश कांबळे, सदस्य गौतम कदम, सदस्य आशिष ननावरे, न्हावा शेवा पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे, वेश्वी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आजी सदस्य अजित पाटील, सदस्य विलास पाटील, विंधणे गावचे उदयोजक तथा भाजप उरण तालुका सरचिटणीस प्रसाद पाटील (गंपू शेठ), वेश्वी गावचे ग्रामसेविका सरोज पाटील, विंधणे गावचे ग्रामसेवक अनिरुद्ध पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कासुकर आदी उपस्थित होते. आपण समाजाचे देणे लागतो, समाजातील गरीब, लोकांना मदत करावी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशावेळेस पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, आम्ही सर्व मंडळी पुढाकार घेऊन मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी पोलीस यंत्रणा मदत करीत आहे. वेश्वी ग्रामपंचायत, विंधणे ग्रामपंचायत, सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत, असे प्रतिपादन प्रसाद पाटील यांनी केले. गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय, गरिबांना मदतीचा हात द्या, त्यांना घास द्या, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ द्या. त्यांच्या पाठीशी राहा. त्यांना अशावेळी मदत करा, असे प्रतिपादन न्हावा शेवा पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे यांनी केले. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम  असल्याने उरण तालुक्यातील आदिवासी, कातकरी, गरीब, गरजू, हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना अशा परिस्थितीत मदत देणे सर्वांचे कर्तव्य आहे. मदतीसाठी सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा आदी सर्व मदतीचा हात देत असल्याचे चित्र दिसत आहे.

मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून आदिवासी वाड्यांत किराणा सामान

मोहोपाडा : प्रतिनिधी

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांना ग्रामपंचायत फंडातून 20 दिवसांपेक्षा जास्त पुरेल इतक्या किराणा सामान वाटप करण्यात आले.  रसायनी परिसरातील सर्वांत मोठी 17 सदस्य संख्या असणार्‍या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत फंडातून मोहोपाडा वासांबे वाडी, शिवनगरवाडी, तलेगाव आदिवासी वाडी, तलेगाववाडी, शिंदीवाडी, खोंडावाडी आदी सात आदिवासी वाड्यांतील जवळपास साडेचारशे पेक्षा अधिक कुटूंबांना धान्य वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिक पदाधिकारी आदींसह त्या त्या ग्रामपंचायत प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य वाटपप्रसंगी उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply