Breaking News

गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली

पनवेल ः वार्ताहर
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची पावले बाजाराकडे पडताना पहावयास मिळत आहेत.
गोकुळाष्टमीपासून पूजेच्या साहित्याची खरेदी जोमाने सुरू झाली आहे. पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोड्याफार प्रमाणात भाववाढ झाली आहे, मात्र याचा परिणाम खरेदीवर होताना दिसत नाही. उलट ग्राहकांची संख्या वाढत चालली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला व्यवसाय होईल, अशी दुकानदारांना आशा आहे.
गणेशोत्सव काळात कापूर, कंठी, लाल रूमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाट, समई , निरंजन, पितळेचे ताट, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी यांना मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे नैवेद्य व प्रसाद वाटपासाठी काजू, बदाम, पिस्ता, खडीसाखर, काजू, मनुके यांचीसुद्धा मागणी दिसून येते.

यंदा लोकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. नियमांचे पालन करून आम्ही विक्री करतोय. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता या वर्षी बाप्पाची कृपादृष्टी आहे.
अमोल येवले, श्री कृष्ण पूजा भंडार, पनवेल

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply