Breaking News

ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून होणार सुरू

मुंबई : प्रतिनिधी

ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नाही किंवा रुग्ण आढळून आलेले नाहीत अशा हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये काही सवलतींसह विशिष्ट कामांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे राज्य सरकारनेही ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना सोमवार

(दि. 20)पासून माफक स्वरुपात परवानगी दिली आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे, तर ग्रीन झोननमधील जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. अशा जिल्ह्यांतील राज्य सरकार परवानगी देणार आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहोचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागणार आहे. कोणत्याही स्वरुपात मजुरांना प्रवास करावा लागणार नाही याचीही काळजी मालकांना घ्यावी लागेल. या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला ही चांगली गोष्ट आहे. सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळायचे आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply