Breaking News

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी; पोलादपुरातील महिलेचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील कोरोनाग्रस्त महिलेचा रविवारी (दि. 19) मध्यरात्री कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच रायगड जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली आहे.

लीला बाबूराव सकपाळ (वय 63) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचे पतीसह पोलादपूरच्या प्रभातनगर येथे वास्तव्य होते. लीलाबाईंचा रविवारी रात्री 12.05च्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती कस्तुरबा रूग्णालयाने दिली. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कस्तुरबा प्रशासनाने  मृतदेह तिच्या नातेवाईकांना न देता सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात घेतला. दरम्यान, या महिलेच्या 68 वर्षीय पतीला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मृत महिलेचा प्रवास तक्ता पोलादपूर पोलीस ठाण्याने तयार केला आहे, मात्र संपूर्ण तक्त्यामध्ये ही महिला कोठेही गेली नाही, पण तिच्या पोलादपूर येथील घरी 22 मार्चला पती, मुलगा व सुन आले होते आणि या महिलच्या पतीला सुरुवातीला 24 मार्च रोजी आजारपण जाणवल्याने त्यांच्यावर महाड येथे खासगी उपचार करण्यात आले. यानंतर पतीची सेवा करताना या महिलेला कोरोनाचा संसर्ग झालीय का, याची तपासणी करण्यात येत आहे. महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या पतीला तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

-पनवेलमध्ये एक नवा रुग्ण

पनवेल : येथील महापालिका हद्दीत रविवारी (दि. 19) नवा रूग्ण आढळून आला नसला, तरी विचुंबे येथे एक रूग्ण आढळला आहे. ही व्यक्ती मूळची तामिळनाडू राज्यातील असून, मुंबईला बीपीटीत कामाला आहेे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील रुग्णसंख्या 40 झाली आहे.

-श्रीवर्धनमध्ये आणखी चार जणांना लागण

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यातील भोस्ते येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांना या विषाणूची लागण झाली आहे. 28 रुग्णांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीवर्धनमधून पनवेल येथे नेण्यात आले होते. त्यापैकी कोरोनाग्रस्ताच्या घरातील चार व्यक्तिंचा रिपोर्ट पॉझिटीव्ह, तर अन्य 24 व्यक्तिंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 49 झाली आहे. खबरदारी म्हणून भोस्ते गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे श्रीवर्धन शहरातील अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकाने मंगळवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply