मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग नगर परिषदेतर्फे अलिबाग -मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिर व लालबाग परिसरातील 1150 लोकांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, सेक्रेटरी डॉ. राजाराम हुलवन, खजिनदार डॉ. अमित बेनकर, राजू घासे, डॉ. गणेश गवळी, डॉ. आशिष भगत आदी उपस्थित होते. नागरिकांच्या कपाळासमोर थर्मल स्क्रिनिंग मशीन सात सेकंद धरली जाते. त्यानंतर यामधून शरीराचे तापमान समजणे सोपे जाते, आशी माहिती डॉ. मयूर कल्याणी यांनी दिली. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीसारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे.