मुरूड ः प्रतिनिधी
रायगड जिल्हाधिकार्यांच्या
निर्देशानुसार मुरूड तहसील व तालुका आरोग्य अधिकार्यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार गमन गवित व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरातील विविध 16 कार्यालयांतील 215 कर्मचार्यांसह पत्रकारांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीच्या कामात ग्रामीण रुग्णालय डॉ. दिव्या सोनम, बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. राजश्री जगताप, अधिकारी परिचारिका संजाली कुलकर्णी, दर्शना म्हात्रे, आरोग्यसेवक राजेंद्र चुनेकर आदी सहभागी होते. या वेळी तहसील कार्यालयासह मुरूड तालुका गटविकास अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, नगर परिषद, भारतीय तटरक्षक दल, कृषी कार्यालय आदी कार्यालयांतील अधिकारी-कर्मचार्यांची सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत कोरोना टेस्ट करण्यात आली. अद्याप कोणत्याही कर्मचार्यात कुठलीही कोरोनासदृश लक्षणे आढळली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.