Breaking News

पदवीधर, शिक्षक निवडणुकीत विक्रांत पाटील यांचा सहभाग

पनवेल : वार्ताहर

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि पुणे येथील पदवीधर, शिक्षक निवडणूक या लढवल्या गेल्या. मंगळवारी (दि. 1) झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण जोर लावला आहे. या निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणुक होईपर्यंत भारतीय जनता मोर्चाचा सहभाग उल्लेखनीय आहे. भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने मतदार नोंदणी, प्रचार आणि मतदानाच्या दिवशी मतदाराला निवडणूक केंद्रा पर्यंत आणणे या सर्व निवडणूक प्रक्रियेत युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. स्वतः विक्रांत पाटील यांनी संभाजी नगर आणि पुणे हे मतदार संघ पिंजून काढले. कार्यकर्त-पदाधिकारी आणि मतदार यांच्या भेटी घेतल्या. पॉवर-पॅक या दौर्‍यांची सुरुवात सकाळी सुरु होत असे व ती रात्री उशिरा पर्यंत चालत असे. या मध्ये छोट्या सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे, संस्था चालकांच्या भेटी गाठी, सूक्ष्म नियोजन आणि सर्व दिवसभराच्या गोष्टींचा आढावा असे सर्व गोष्टींचा यात समावेश होता. भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि त्यांच्या टीम या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड मेहनत घेतली. या सर्व निवडणूक प्रक्रियेतून वेळ काढून विक्रांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल, कामोठे, उरण, उलवे, खालापूर आणि कर्जत इथे मंडल प्रशिक्षण शिबिरात आत्मनिर्भर भारत या विषयावर व्यख्यान सुद्धा दिले. विक्रांत पाटील आणि त्यांच्या टीमचे कौतूक सर्व स्तरावरून होत आहे. पदवीधर, शिक्षक निवडणूकीत भाजपच्या विजयात भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा नक्कीच खारीचा वाटा असणार हे निश्चित आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply