Breaking News

पनवेलकरांना उत्सुकता मेट्रोच्या आगमनाची; सप्टेंबरमध्ये येणार 18 कोच, सिडकोची जोरदार तयारी

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई परिसरातील बहुद्देशीय प्रकल्प म्हणून चर्चेत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेला मेट्रोचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून या मेट्रोच्या मार्गावर धावणारे मेट्रोचे कोच नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 6 कोच सध्या नवी मुंबई तळोजा फेज 1मधील मेट्रोच्या डेपोमध्ये दाखल झाले आहेत, तर उर्वरित 18 कोच सप्टेंबरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.

 नवी मुंबई शहराच्या विकासात भर देणारा मेट्रो प्रकल्प सध्या नवी मुंबईच्या चर्चेचा विषय आहे. मुंबईत मेट्रो धावल्यानंतर नवी मुंबईमध्ये मेट्रा कधी धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सिडकोने नवी मुंबईतील शहरे विकसित केल्यानंतर या शहराचा मुंबईच्या वाहतूक प्रणालीशी संपर्क वाढविण्यासाठी सिडकोने शहरातील मेट्रो रेल्वेमार्गाचा विचार केला आणि दिल्ली रेल महामंडळाकडून मिळालेल्या सूचनेनुसाऱ महाराष्ट्र राज्य सरकारने 30 सप्टेेंबर 2010 रोजी नवी मुंबई मेट्रो मार्गिका 1 बेलापूर-पेधर-कळंबोली-खांदेश्वर मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली आहे. या टप्प्यातील पहिला मेट्रो मार्गाचे काम सुृरू झाले. जवळपास 1985 कोटी रुपये खर्च करून बेलापूर-खारघर-तळोजा-पेधर या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या 11 किमीच्या मार्गावर जवळपास 11 मेट्रो स्थानके बनवण्यात आली आहेत. ही सर्व स्थानके वसाहतीमधील गजबजलेल्या परिसरामधून जात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प नक्कीच रहिवाशांच्या पसंतीला उतरणार आहे. मेट्रोच्या पूर्वतयारीपूर्वीच मोट्रो प्रकल्पासाठी एकूण सहा मार्गिकांची आखणी करण्यात आली आहे. त्यापैकी उरण-रांजणपाडा- नेरूळ आणि रांजणपाडा-खारकोपर- सीवूड्स या दोन मार्गिकेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासोबत बेलापूर-खांदेश्वर-नवी मुंबई अांतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गिकेचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारे कोचदेखील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. या मेट्रोचे कारशेड अर्थात डेपो तळोजा फेजमध्ये विकसित करण्यात आले आहेत.  या डेपोमध्ये नवीन विकत घेतलेले 6 कोच ठेवण्यात आले आहेत, तर 18 नवीन कोच सप्टेंबरमध्ये घेतले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच टप्पा-1मधील मेट्रो धावताना दिसणार आहे. या मेट्रोच्या जाळ्यानंतर नवी मुंबई शहर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडले जाणार आहे. या मुंबईशी जोडल्या जाणार्‍या प्रकल्पाचा सिडको हद्दीतील खर्च सिडको आणि अन्य मेट्रो प्रकल्पाचा खर्च एमएमआरडीए आणि एनएनएमसी उचलणार आहे.या प्रकल्पामुळे विकासालाही चालना मिळणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply