Breaking News

भाजयुमोच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी (दि. 25) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिवादन करून या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. 18 ते 35 वयोगटाच्या व्यक्तींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून भारतभूमीचे सुपुत्र श्रद्धेय अटलजी, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडियाचा सुशासनावर भर, भारतची 05 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, फुकटखोरी राजकारणातून विकासाच्या राजकारणाकडे जाणे काळाची गरज, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारचे युवकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत, अमृतकाल येणारा भारत व युवकांचे योगदान असे स्पर्धेचे विषय होते.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या स्पर्धेला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, अक्षय सिंग, अजिंक्य भिडे, अनिकेत भोईर, नूतन पाटील तसेच परीक्षक प्राध्यापक बाळासाहेब बडे उपस्थित होते.

असा आहे स्पर्धेचा निकाल

भाजयुमोतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा कदम (पारितोषिक 3000 रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक लक्ष्मण कचरे (पारितोषिक 2000 रुपये व सन्मानचिन्ह) तर तृतीय क्रमांक दीप्ती पाटील (पारितोषिक 1000 रुपये व सन्मानचिन्ह) असे देण्यात आले. दरम्यान, सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply