Breaking News

नवी मुंबईत भाजपतर्फे सफाई कामगारांना धान्याचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनामुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अत्यंत गरजवंतांना मोफत धान्य वितरणाचा धडाका सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सफाई कर्मचार्‍यांची आवश्यकता ओळखून आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून मनपा सफाई कर्मचारी यांना माजी नगरसेवक व नवी मुंबई भाजप महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते धान्याचे मोफत वाटप करण्यात आले.

तसेच प्रभाग क्र. 60 येथे अनुसूचित जाती भाजप जिल्हाध्यक्ष  विकास सोरटे, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, जेम्स आवारे यांच्या हस्ते, प्रभाग क्र. 64 मध्ये नगरसेविका दिव्या गायकवाड व वैभव गायकवाड यांच्या हस्ते, प्रभाग क्र. 61 येथे समाजसेवक महेश दरेकर व सिद्धिविनायक फाउंडेशनच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांच्या हस्ते, वाशी मराठी साहित्य मंदिर येथील ज्येष्ठ नागरिक, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता समाजसेवक  जगन्नाथ जगताप, अशोक विधाते व महेश मढवी, नेरूळ येथे श्रीमती सुहासिनी नायडू, अमर पाटील, छाया कदम, शशिकांत मोरे, आदिनाथ सारूक यांच्या हस्ते धान्य वितरीत करण्यात आले. आजपर्यंत आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून सुमारे 50 टन धान्य वाटप स्वखर्चाने करण्यात आले असल्याची माहिती निलेश म्हात्रे यांनी दिली.         

या वेळी भाजप महामंत्री व माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना व्हायरस सारख्या आजारामुळे आपला देश हा बिकट स्थितीतून जात आहे. अशा वेळी एक देशसेवा म्हणून मदत करताना एक भारतीय नागरिक या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. ही मदत नसून या देशाने, राज्याने एक जबाबदार नागरिक म्हणून आजवर मला जे दिले त्याचीच परतफेड म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही हे धान्य वाटप मोफत करीत आहोत. या पलीकडेही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच त्यांच्याकडूनच आम्हाला जनसेवा करण्याची स्फूर्ती मिळत असल्याचे निलेश म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply