Breaking News

वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध; बीपीसीएल कंपनीविरोधात आक्रमक भूमिका

मोहोपाडा : प्रतिनिधी

दांड रसायनी रस्त्यालगत वावेघर हद्दीत बीपीसीएल कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीने सुरु असलेल्या कामास प्रतिबंध

करुन काम थांबविले आहे.

बीपीसीएल कंपनीकडून वावेघर ग्रामपंचायतीला कोणतेही कागदपत्र अथवा परवानगी न घेता काम सुरु केल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठीचे सुचना पत्र देण्यात आले होते. परंतु दुसर्‍या दिवशीही ठेकेदाराकडून काम बंद न झाल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने खोदकाम बंद करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव जमवून निदर्शने करण्यात आली. या वेळी जमलेला जमाव पाहून कोरोना आजाराची कोणालाही भिती नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीचे थकीत कर बीपीसीएल कंपनीकडून येणे बाकी असल्याने आमचा हा लढा असल्याचे वावेघर ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. शिवाय हा लढा कोणत्याही शेतकरी अथवा शेतकरी संघटनेविरुद्ध नसून बीपीसीएल आणि एचओसी कंपनीने बुडविलेला कर मिळविण्याच्या दृष्टीने सुरु असल्याचे वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच विलास माळी यांच्यासह ग्रामपंचायत कमिटीने

बोलताना सांगितले.

यावर बिपिसिएलच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता आम्ही परीसरातील ग्रामपंचायतीना ज्याप्रमाणे कागदपत्रे जमा करायला सांगितले त्याप्रमाणे वावेघर ग्रामपंचायतीने याअगोदर जमा केली नाहीत. त्यासाठी आम्ही मागणी केली आहे, असे बिपिसिएलचे अधिकारी येलपाले

यांनी बोलताना सांगितले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply