Breaking News

अभिनेता मनमीत ग्रेवालची आत्महत्या

पनवेल : बातमीदार

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडानमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने तसेच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत ग्रेवाल याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घऱातच गळफास घेत त्याने आपले आयुष्य संपवले. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसंच अ‍ॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केले होते. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने लॉकडाउनमुळे मनमीत खूप त्रस्त होता. आर्थिक अडचणींमुळे आधीच अनेक समस्या असताना लॉकडाऊनमुळे त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. छोट्या भूमिकाही मिळत नसल्याने त्याचा तणाव वाढला होता. यामुळे अखेर त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की, घराचे भाडे देण्यासाठीही पैसे नव्हते. याच तणावाने अखेर त्याचा जीव घेतला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply