कळंबोली : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने या लॉकडाऊनमध्ये वयस्कर व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्या विविध विधीसाठी येणारा खर्च काही समाजप्रबोधन व्यक्ती गोरगरीबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूच्या वाटप करण्यासाठी वापरत आहेत त्याचा प्रत्येय खांदा कॉलनीमध्ये आला. उद्योगपती राहुल पारगावकर यांनी जलदान विधीसाठी येणारा खर्च व त्यात आणखी आर्थिक मदत करत कोरोना महामारीत गोरगरीब जनतेला मदत करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेला दिला. कालकथित संजीवनी परशुराम मिसाळ यांचे गुरुवारी (दि. 14) वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाच्छात त्यांची मुले जीतेन्द्र परुशुराम मिसाळ, राजेंद्र परुशुराम मिसाळ, मुलगी उज्वला शशिकांत लोखंडे व अनिता राहुल पारगावकर तसेच जावई राहुल पारगावकर असा परिवार आहे. कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन असल्याने त्यांचा जलदान विधी कार्यक्रम घरीच मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत उरकण्यात आला. खांदा कॉलनीतील उद्योगपती राहुल पारगावकर यांनी आपल्या सासुबाई कालकथीत संजीवनी मिसाळ यांच्या जलदान विधी कार्यक्रमासाठी लागणारा खर्च लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गोरगरीब जनतेला काही मदत होईल, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळ या संस्थेला सुपुर्द करण्यात आला. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्या दिवसांपासून गोरगरीबांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू किवा साधनसामुग्रीच्या स्वरुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळ मदत करत आले आहे. त्यांच्याकडून मदतीचा ओघ चालूच आहे. मंडळाने त्या बद्दल राहूल पारगावकर आभार मानले.