Breaking News

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात झाला.
या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र विधानसभानिहाय नमो चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदारसंघात रंगलेल्या नमो चषक 2024 स्पर्धत एक लाख 13 हजार 278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. या महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना या पारितोषिक वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून या सोहळ्यास क्रीडापटू व क्रीडारसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, खारघर अध्यख नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक यांनी केले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply