Breaking News

नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांचे अभिनंदन

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. साहेबराव ओहोळ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ओहोळ यांचे अभिनंदन केले. डॉ. साहेबराव ओहोळ फुंडे महाविद्यालयात अनेक वर्षांपासून कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होते. डॉ. साहेबराव ओहोळ यांचे राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. डॉ. ओहोळ यांची कॉमर्स विषयातील काही पुस्तके प्रसिध्द आहेत. तसेच ते एका आंतरराष्ट्रीय जर्नलचे सहसंपादक आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख उरण परिसरात आहे. त्यांची सेवाज्येष्ठता व शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम काम लक्षात घेऊन, रयत शिक्षण संस्थेने त्यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या भावना घाणेकर, सुधीर घरत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी प्रा. डॉ. विलास महाले व प्रा. डॉ. एम. सी. सोनावले उपस्थित होते.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply