पनवेल : वार्ताहर
कर्नाटकमधून मुंबई ला प्रवाशी घेऊन चाललेल्या बसचा अपघात झाल्याची घटना सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली वसाहती जवळ घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सगळ्या प्रवाशांवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बसमध्ये 7 प्रवाशी होते त्यापैकी एक प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगितले जात आहे. कर्नाटकमधून ( क्र. केए 51 एए 2013) खाजगी ट्रॅव्हलर मधून सात प्रवाशी हे मुंबई च्या दिशने शनिवारी निघाली होती, ही खाजगी ट्रॅव्हलर सायन पनवेल द्रुतगती महामार्गावरील कळंबोली वसाहती जवळ आली त्याच वेळी, या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला (क्र. एमएच 04 जी 9251) खाजगी बस बंद अवस्थे मध्ये उभी होती. त्याच वेळी मुंबई च्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हलर ने या बंद बसला मागून जोरात धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वेळी ट्रॅव्हलर बसमध्ये सात प्रवाशी प्रवास करत होते. त्या पैकी एक प्रवाशी जखमी झाले आहे त्याच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.