पनवेल : बातमीदार : बेलापूर ते पेंदार या नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गासाठी लागणार्या दोन मेट्रोच्या सहा डब्यांची जुळवाजुळव करण्याचे काम येत्या काळात पूर्ण होणार असून एप्रिल माध्यापर्यंत डेपोमध्येच दोन मेट्रोची चाचणी पूर्ण केली जाणार आहे. या मार्गावरील अद्याप स्टेशन बांधली गेलेली नाहीत. ती येत्या सहा महिन्यात बांधली जातील असा विश्वास सिडकोला आहे. सिडकोने नवी मुंबईतील दक्षिण भागात पाच मेट्रो मार्ग सुरू करणार आहे. आठ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील बेलापूर ते पेंदार या 11 किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम एक मे 2012 रोजी सुरू झाले आहे. पहिल्या तीन वर्षांतच हा मार्ग सुरू होणार होता पण विमानतळ प्रकल्पामुळे या प्रकल्पाकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामळे तीन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प चक्क आठ वर्षे झाली तरी पूर्ण झालेला नाही. विद्यमान व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या प्रकल्पाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून 11 स्टेशन्स बांधण्याचे काम चार कंत्राटदारांना विभागून दिले आहे. यापूर्वी ते एकाच कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्याने ते मुदतीत पूर्ण न केल्याने हा प्रकल्प चार वर्षे रखडला आहे. आता या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून दोन मेट्रो रेल्वेसाठी लागणारे सहा रेक्स चीनवरून आयात झालेले आहेत. येत्या महिन्याभरात या रेक्सची जुळवाजुळव करून दोन मेट्रो रेल तयार केल्या जाणार आहेत. मेट्रो स्टेशनच्या बांधणीला वेग आला असून दोन मेट्रो रेल्वेसाठी लागणारे सहा रेक्स चीनवरून आयात झालेले आहेत. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबई मेट्रोचे काम पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोला वाटत आहे. सध्या हे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे.
Check Also
‘सामना’ पन्नाशीचा झाला…
काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …