पनवेल : बातमीदार : तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता शिवपूजन व शिवआरती करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक संजय पाटकर, हभप महेश महाराज साळुंखे प्रकाश पाटील, किशोर तांडेल, के.ए.म्हात्रे, बाळशेठ ठाकरे, प्रभाकर पाटील, रेखा म्हात्रे, वैभव पाटील, विजय डाऊल, नंदराज मुंगाजी, धनराज पाटील, जयदास भगत, प्रकाश जितेकर, वैभव घरत, श्रावण भल्ला, कुंडेवहाळ येथील प्रकाश पाटील, तंटामुक्त समितीचे चंद्रकांत पाटील, विवेक मोकल, सागर फुंडेकर, वसंत आंबरे, रेशम जितेकर, रविंद्र पाटील, पत्रकार राज भंडारी, ग्रामस्थ अशोक पाटील, सूर्यभान सर्जेराव यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्प देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश ठोंबरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला संस्थेचे समाधान लाड, अजय सावंत, सुरज पाटील, विनय पाटील, रमेश ठोंबरे, विक्रम पाटील आदींसह परिसरातील नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …