Breaking News

रमाई आवास योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

उरण : वार्ताहर – रमाई आवास योजना (नागरी) अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकातील दारिद्र रेषेखालील व्यक्तींना नवीन घर किंवा कच्चे असलेले घर पक्के करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून रमाई आवास योजना अंतर्गत अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने उरण शहर हददीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध (दारिद्र रेषेखालील) व्यक्तींनी उरण नगरपरिषद कार्यालयात खालील कागदपत्रा सहित आपला प्रस्ताव सादर करावा.

यासाठी जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वार्षिक उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, कर पावती, घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल सातबारा उतारा, मालमत्ता रजिस्टर उतारा, मतदार कार्ड आदी कागद पत्रांची प्रस्ताव सोबत जोडावे व परिपूर्ण प्रस्ताव उरण नगरपरिषदकडे अर्जासहित बांधकाम विभागाकडे सदर करावा, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply