पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी
(दि. 11) कोरोनाचे 226 नवीन रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. दिवसभरात 181 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 97 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 45 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 28 रुग्ण बरे झाले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल आणि कळंबोली मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीत 33 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 599 झाली आहे. कामोठेमध्ये 36 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 811 झाली आहे. खारघरमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 695 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 550 झाली आहे. पनवेलमध्ये 41 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 679 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 177 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 3511 रुग्ण झाले असून 2103 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.90 टक्के आहे. 1316 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 92 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात शिवकर आणि करंजाडे येथील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत उलवे आठ, करंजाडे सहा, आदई पाच, बंबावीपाडा चार, डेरवली, नेरे, कोप्रोली, शिवकर व विचुंबे येथील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये 1171 त्यापैकी 1099 पॉझिटिव्ह आल्या 11 टेस्टचे अहवाला येणे बाकी आहे. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 18 जणांना कोरोना 20 रुग्णांना डिस्चार्ज; एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात शुक्रवारी (दि. 10) कोरोनाचे 18 रुग्ण आढळले असून 20 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जासई येथील एक कोरोना रुग्णचा मृत्यू झाला. आढळलेल्या रुग्णांमध्ये उरणमध्ये चार, जेएनपीटी तीन, मोरा तीन, चीर्ले (गावठाण), भेंडखळ, करंजा, केगाव, पागोटे, विंधणे, चिरनेर, जसखार येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये गोवठणे चार, उरण तीन, धुतूम तीन, रांजणपाडा दोन, दिघोडे दोन, चिर्ले, करंजा, बोकडवीरा, नवीनशेवा, नवघर, सावरखार येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 438 झाली आहे.
कर्जत तालुक्यात 14 रुग्णांची वाढ; एक जण मृत्युमुखी
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात शुक्रवारी आणखी 14 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मध्ये एका माजी नगरसेवकाचा व एका माजी सरपंच यांचा समावेश आहे. त्यातच गुरुवारीच पॉझिटिव्ह आढळलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 226 वर
पोहोचला आहे.
आढळलेल्या रुग्णांत मुद्रे बुद्रुक 54 वर्षीय व्यक्ती, वावळोली 30 वर्षीय आणि 27 वर्षीय युवक, दहिवली 45 वर्षीय व्यक्ती, पोसरी 37 वर्षीय तरुण, वर्णे 31 वर्षीय तरुण, तिघर धनगरवाडा 20 व 21 वर्षांचे दोघेजण, गुंडगे 36 वर्षीय व्यक्ती, शहरात 30 वर्षीय तरुण, सालवड 31 वर्षीय तरुण, नेरळ शहरात 52 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
नवी मुंबईत 361 जण बाधित
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी (दि. 10) 361 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर 202 जण कोरोनामुक्त झाले. कोरोना बधितांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या आठ हजार 879 झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या पाच हजार 285 झाली असून दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 284 झाली आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबईत तीन हजार 310 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 35, नेरुळ 75, वाशी 25, तुर्भे 27, कोपरखैरणे 47, घणसोली 62, ऐरोली 71 व दिघा 19 असा समावेश आहे.
पेण तालुक्यात 57 जणांना लागण
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असुन प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या 330 वर गेली आहे. श्ाुक्रवारी पेणमध्ये 57 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असूप नऊ रुग्ण बरे झाले आहेत. तर दोघांचा
मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये जिते नऊ, तरणखोप चार, प्रभुआळी, वडखळ, कवंडाळ तळे, वरेडी-हमरापूर, गोविंदबाग येथे प्रत्येकी तीन, तांबडशेत, अष्टविनायक नगर, पारिजात सोसायटी, कोप्रोली येथे प्रत्येकी दोन, दादर, जोहे, गडब, आस्था सोसायटी, नरदास चाळ, खारपाडा, तरळेआळी, अंतोरे, शिहू, नंदीमाळ नाका, झोतिरपाडा, संत आळी, रामवाडी, शिक्षक सोसायटी, तुकारामवाडी, वाशी, समर्थनगर, कुंभार आळी, पाटणोली, कोलवे, लोकमान्य सोसायटी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महाडमध्ये बाधितांचे शतक
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये शुक्रवारी पुन्हा 10 जनांना कोरोनाची लागण झाली असुन नऊ जण उपचारा दरम्यान बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्युनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना ग्रस्तांचे शतक पुर्ण झाले आहे.
आढळलेल्या रुग्णांत बिरवाडीमध्ये दोन, वरंध येथील एकाच घरातील चार, काकरतळे महाड, एमआयडीसी, श्रेयस अपार्टमेंट, नवेनगर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महाड मध्ये 38 रुग्ण उपचार घेत असुन, 53 रुग्ण बरे झाले आहेत, तर नऊ जनांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात एकुण 100 रुग्णांची
नोंद झाली आहे.
रोह्यात 20 नवे रुग्ण
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यात शुक्रवारी 20 कोरोनाबाधीत व्यक्ती आढळल्याने एकुणबाधितांची संख्या 234 वर पोहचली आहे. तर नऊ व्यक्ती बरे झाल्याने एकूण बरे झालेले रुग्ण 146 आहे. तालुक्यात आता सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 86 झाली असुन दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत शहरात आठ तर ग्रामीण भागात 12 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 16 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.