Breaking News

‘रोटरी’तर्फे कळंबोलीत रक्तदान शिबिर

कळंबोली : प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या सौजन्याने शनिवारी (दि. 15) स्वतंत्र दिनी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समाज मंदिर कळंबोली येथे आयोजित या रक्तदान शिबिरात 58 रक्तदात्यानी रक्तदान केले. या वेळी शासन नियमांच्या अधिन राहून त्याचे काटेकोर पालन करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

कोविड-19 रुग्णांना रक्ताच्या तुटवट्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. या रुग्णाना जीवनदान मिळावे म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष किशोर रुद्रावर यांच्या प्रयत्नातून आर सी खारघर मिड टाऊन, लायन्स क्लब  ऑफ न्यू पनवेल, राजस्तानी विकास संस्था कळंबोली, भारत गॅस कळंबोली, अंबिका योग्य कुटीर पनवेल, अभ्युदय को ऑफ बँक कळंबोली व राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  राजस्थान विकास संस्था, अंबिका योग कुटिर, रोटरी क्लब खारघर मिडटाऊन, लायन्स क्लब न्यू पनवेल, भारत गॅस, ज्येष्ठ नागरीक संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा म्हणून सेक्रटरी बी जे वाघ, प्रोजेक्टर डायरेक्ट शिवाजी सालुंखे, सहसचिव पी एस हातकेर, यांनी आवाहन केले होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply