Breaking News

खारपाटील गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

पनवेल : वार्ताहर

आदर्श शिक्षक गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या परिवाराकडून दशक्रिया विधी आणि उत्तरकार्यादिनी चिरनेर स्मशानभूमी आणि खाडी येथे वड, पिंपळ रोपांची लागवड करण्यात आली. गुरुजींचा शैक्षणिक वारसा स्मरणात राहण्याकरिता दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल, असे त्यांचे पुत्र पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी या ठिकाणी जाहीर केले. या वेळी उद्योगपती पी. पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, सदस्य रमेश फोफेरकर, नमस्ते मोकल, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, इंटकचे उरण तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, आदर्श शिक्षक रोहिदास ठाकूर, भाजपचे चिरनेर विभागीय अध्यक्ष शशी पाटील, नरेंद्र महाराज संतसंगचे सेवा केंद्र प्रमुख सुरेश केणी आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply