पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) 489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे 393 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन, खालापूर दोन तसेच पेण, अलिबाग, सुधागड, महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 252, अलिबाग 50, पेण 40, उरण 30, खालापूर 25, महाड 24, माणगाव 20, कर्जत 19, रोहा 11, सुधागड सात, मुरूड चार, म्हसळा व पोलादपूर प्रत्येकी तीन, तळा एक असे आहेत.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …