उरण : वार्ताहर
उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे हळदीकुंकू व बक्षीस समारंभ नुकताच झाला.
कोरोना काळात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नवरात्रोत्सव निमित्ताने महिलांसाठी आई आणि मी सपर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्था सभासदांसाठी रंग सप्तमीचा हरवा व पूजा थाळी फोटो मागविण्यात आले होते. अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये प्राविण्य दाखविणार्या विजेत्यांना प्रथम, द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षीस देऊन
गौरविण्यात आले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अंजना गायकवाड व पोलीस रचना ठाकूर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला होता. यामध्ये हळदी कुंकू, तिळगुळ, फुले व वाण देण्यात आले.
कार्यक्रमासाठी आलेल्या उलवे यु ट्यूबच्या सामाजिक कार्यकर्त्या सिमा ध्यास, पत्रकार दिनेश पवार व अष्टभुजा हिरकणी वृत्तपत्रच्या पत्रकार तृप्ती भोईर यांना पुष्प रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्ष गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर, खजिनदार अॅड. वर्षा पाठारे व कार्यकारिणी सदस्य कल्याणी दुखंडे, प्रमिला गाडे, सीमा घरत, गौरी मंत्री, नाहिदा ठाकूर, अफशा मुकरी, दीपा शिंदे, नीलिमा थळी, दिपाली मुकादम, प्रगती दळी, संगिता पवार, शुभांगी शिंदे आदी महिला उपस्थित होत्या.