पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन पनवेलमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयात प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत इंग्लिश मीडियमच्या ज्युनिअर केेजी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रमाला चांगू काना ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोटियन मॅडम, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नीरजा मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांसह मान्यवर उपस्थित होते.