Breaking News

कोरोना महामारीत काम करणार्या डॉक्टर्स आणि पत्रकारांचा सन्मान; बीड खुर्द भाजपचा स्तुत्य उपक्रम

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पसरू नये यासाठी देशांतर्गत टाळेबंदी केली तेव्हापासून ग्रामीण भागातील नागरिकांनी शहराकडे पाठ फिरवली असून, अशा काळात धीर देणारे डॉक्टर्स व आशा वर्कर तसेच पत्रकारांचा सन्मान भाजप युवा मोर्चा विभाग अध्यक्ष लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून भाजप बीड खुर्दच्या वतीने करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनासह अनेकांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता देवदूत म्हणून अहोरात्र जनतेची आणि रुग्णांची सेवा करण्यात येत आहे. डॉक्टर्स, पोलीस, नर्स, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी यांनी आपापल्या परीने समाजाची सेवा केली. अशा बीड खुर्द पंचक्रोशीतील डॉ. राजेश पाटील, डॉ. नितीन पिंगळे, डॉ. रामदास लबडे, तसेच युवा पत्रकार दिनेश पाटील, समाधान दिसले यांच्यासह आशा वर्कर सेविकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप बीड खुर्दच्या वतीने आणि युवा मोर्चा कलोते पंचायत समिती विभाग अध्यक्ष लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, खालापूर तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, पंचायत समिती विभाग अध्यक्ष लवेश कर्णूक, माणकिवली ग्रामपंचायत सदस्य विकास रसाळ, तालुका उपाध्यक्ष आबा देशमुख, विभाग अध्यक्ष नारायण कर्णूक, केळवली अध्यक्ष जयेश कर्णूक, बबन चोरघे, अनिल कर्णूक, देविदास कर्णूक, कमोद कर्णूक, अंकुश कर्णूक, रामदास भगत, मच्छिंद्र कर्णूक, मोतीराम कर्णूक, कृष्णा पवार, दीपक ठोंबरे, संतोष तांडेल, आदिनाथ बडेकर, किरण कर्णूक, रोशन कर्णूक, संतोष भगत, महेश चंदन, श्रीराम कर्णूक, हरेश काळेकर, सुभाष भगत, सचिन ब. कर्णूक, नरेंद्र कर्णूक, रमेश कर्णूक, किशोर कर्णूक, रोशन कर्णूक, सूर्यकांत पाटील, रोहन कर्णूक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply