पनवेल : रामप्रहर वृत्त
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 25) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजात तीव्र आक्रोश आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने पोलीस भरतीची घोषणा करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे मराठा समाजात सरकारविरोधात तीव्र असंतोष पसरला असून, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे एकाच दिवशी 20 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा रायगड आणि सकल मराठा समाज रायगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!
मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper