Breaking News

माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

पनवेल प्रभाग क्र. 19मध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही आरोग्य मोहीम शासनाने हाती घेतली आहे. पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 24) करण्यात आला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी या आरोग्य मोहिमेस पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र 19मध्ये कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालय आणि घाटे आळी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 येथून शुभारंभ झाला. या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, हारू भगत यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या.  या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना नागरिकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गन आणि ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी ऑक्सी मीटर देण्यात आले.
या मोहिमेसाठी पनवेल महापालिकेने विविध टीम तयार केल्या असून, सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने स्वयंसेवक नेमले आहेत. या टीम घरोघरी जाऊन लोकांचा सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये नागरिकांची तपासणी करून ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची टेस्ट केली जाणार आहे. या मोहिमेतंर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्याने कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होणार आहे.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply