मुरुड : प्रतिनिधी
सध्या फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्या अनुशंघाने अभयारण्यातील वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती वन कर्मचार्यांना देण्यासाठी डॉ. संतोष देवरुखकर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.
या वेळी डॉ. देवरुखकर यांनी, विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. त्याचप्रमाणे कॅन्सरला दूर ठेवणार्या औषधी वनस्पती, तुटलेली हाडे जुळवण्यासाठी लागणार्या वनस्पतींची माहिती सांगून फणसाडमधील वनस्पती एखाद्या कंपनीस दिल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते, असे मत व्यक्त केले. स्थानिक शेतकर्यांनी लिची, पपई, स्ट्रॉबेरी या सारखी पिके घेतली पाहिजेत. असेही त्यांनी सांगितले.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन कर्मचार्यांनी फणसाड परिसर स्वच्छ करून गोळा केलेल्या पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी हर्षवर्धन भोसले, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, वनपाल यु. दि. पाटील. वनपाल ये. पी. परब, वनरक्षक एम. एम. नाझरकर, जी. आर. दिघे, व्ही. एस. मुंडे, के. बी. बांगर, दि. ये. शिंदे आदीसह वन कर्मचारी उपस्थित होते.