Breaking News

जिल्हाधिकार्यांकडून उरणची पाहणी

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्याचा बुधवारी (दि. 29) धावता दौरा केला. कोरोनाबाबत या वेळी उरण येथील परिस्थिती जाणून घेतली. संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी या संदर्भात काही सूचना आणि मोलाचे मार्गदर्शन केले.

कोरोनापासून दक्षता घ्या, खबरदारी घ्या, नागरिकांचे आयुष्य वाचवा कायद्याची कठोर अंबलबजावणी करा. कोणत्याही परिस्थितीत रायगड जिल्हा कोरोना विरहीत होऊन ग्रीन झोनमध्ये आला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना ही अधिकार्‍यांना दिल्या.

या वेळी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठलराव दामगुडे, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी व अधिकारी  उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply