पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी व त्याच्या सहकार्यांनी संस्था संचालित शाळेत शिक्षण घेत असणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले व त्यांना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अध्यक्ष इकबाल हसेन काझी यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्य शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. जेणेकरून संस्था संचालित शाळांमध्ये शिक्षण घेणार्या गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. संस्थेचे अध्यक्ष इकबाल हुसेन काझी यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षात अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. पनवेल एजुकेशन सोसायटीच्या जानेवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर इकबाल हुसेन काझी यांची एकमताने संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची सूत्र हाती घेतल्यानंतर जानेवारी 2017 ते जानेवारी 2020 पर्यंत केलेल्या कामाचा अहवाल. संस्था संचालित शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले ज्याने संस्था संचालित शाळांचा निकाल उंचावला. संस्थेच्या तळोजा शाळेतील मार्च 2018च्या एसएससीच्या परीक्षेत सात विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण. संस्थेच्या पी. ई. एस. इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेजची स्थापना तसेच या शाळेसाठी आवश्यक महाराष्ट्र शासनाच्या व शिक्षण खात्याकडून सर्व परवानग्या/मान्यता/इंडेक्स नंबर प्राप्त करून घेतल्या यासाठी 15 रुपयांचे एफडी केले.