Tuesday , February 7 2023

खारघरच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात रंगली सूत्रसंचालन स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर येथे ’सुत्रसंचालन’ स्पर्धा 29 नोव्हेंबर रोजी मोठया उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण 19 मुलांनी सहभाग घेतला होता. मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी सुत्रसंचालन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी लावणी, गणेशवंदना, कोळीनृत्य हे विषय देण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये 11 वी विज्ञान शाखेतील जागृती मोरे ही प्रथम आली आहे, तर व्दितीय क्रमांक 11 वी विज्ञान शाखेतील श्रुती घरत हीने मिळवला आहे. तृतीय क्रमांक 11 वी वाणिज्य शाखेतील अंजली धुमाळ हीचा आला आहे. तसेच उत्तेजनार्थ 12 वी वाणिज्य शाखेतील टिशा श्रीयान हीचा आला आहे.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य कैलास म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख स्वप्ना भांडवलकर यांनी केले होते.

या स्पर्धेकरीता चेअरमन खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, ज.भ.शि.प्र.संस्थेचे सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply