Breaking News

शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपत

नवी मुंबई : बातमीदार

प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे इलठणपाडा, सुभाषनगर व परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. सोशल डिस्टन्सिंग पाळत पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात  आ. नाईक यांनी या सर्वांचे स्वागत केले. या कार्यकर्त्यांचा भाजपत योग्य सन्मान राखला जाईल. माझ्या आमदारकीची अद्याप चार वर्षे बाकी असून या कालावधीत प्रभाग 2 आणि 5 चा कायापालट करू. पाणी, रस्ते, हॉस्पिटल सर्व काही सुविधा निर्माण करू, अशी ग्वाही दिली. आगामी निवडणुकीत नवी मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक किशोर गायकर, माजी नगरसेविका सुनिता पिंगळे, विशेष कार्यकारी अधिकारी पंढरीनाथ पाटील, माजी शाखाप्रमुख राजेश जैस्वाल, राष्ट्रवादीचे नागेश नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते, माजी नगरसेविका दिपा गवते आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply