हेल्पींगहॅन्ड सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील चाहुचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कल्याण येथील हेलपिंगहॅन्ड या सामाजिक संस्थे तर्फे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांनी हेलपिंगहॅन्ड या संस्थेशी संपर्क करून चाहुचीवाडी शाळेतील पहिली ते पाचवीच्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वसावे, गिरेवाडी शाळेचे शिक्षक वसंत ढोले, हेल्पींगहॅड सामाजिक संस्थेचे सचिन राऊत, तुषार दांडे, संकेत गाडेकर, संदिप नलावडे, ग्रामपंचायत सदस्या निलम ढोले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कमल बांगारे, सदस्य बुधाजी ढोले, मनोहर शेंडे, जयश्री ढोले, गुलाब ढोले, संजना निरगुडा, कुंदा ढोले, जया ढोले, रंजना पारधी, सुशिला मेंगाळ, काशिनाथ बांगारे, महादू ढोले, पांडू ढोले, वामन ढोले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.