स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पनवेल : वार्ताहर – वापरलेले मास्क आणि रबरी हातमोजे रस्त्यावर टाकण्याचे प्रकार नवीन पनवेल परिसरात वाढले असून, त्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी पनवेल महापालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत.
कोरोनाचा भयानक काळ चालला असून, सर्वांनी सुरक्षित राहण्याचे सल्ले देत असताना नवीन पनवेल विजय मार्गावर सेक्टर 18 ममता हॉटेलसमोर पंचशील नगरसमोर वापरलेले मास्क व रबरी हात मोजे मोठ्या प्रमाणात कोणी तरी रस्त्यावर टाकून दिले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या संदर्भात अधिकारीवर्गाने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.