भाजपचे किरण मुंबईकर यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
करंजाडे नोड मधील सेक्टर 2 येथे सिडकोच्या जलकुंभामध्ये एकूण 4 पंप 75 एचपीचे असून, काही दिवसांपुर्वी तिसरा एचपी पंप बंद पडला होता. ही बाब भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी सिडकोच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पंपावर मोटार बसविण्यात येण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सिडकोकडून पंप दुरूस्त करण्यात आले.
सिडकोच्या नवीन पनवेल येथील पाणी पुरवठा सहाय्यक अभियंत्यांनी काम पूर्णत्वास आणल्याचे पत्र किरण मुंबईकर यांना दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, अंतर्गत चुकांमुळे बंद पडलेले पंप दुरूस्त करून दोन पंपांवर पाणी देणे चालु केले आहे. तसेच गुरुवार (दि. 19) पासून तिसर्या पंपावरती पाणी पुरवठा करण्यात येत असून पाणीपुरवठा व्यवस्थीत चालु आहे.
पाण्याचा दाब हा तिसर्या पंपाला व्यवस्थीत मिळत असून सध्या पंप चा कोणताही प्रश्न येत नाही. मुंबईकर यांच्या पत्राचा विचार केलेला असुन सर्व प्रकारे पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा याची दक्षता घेत असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे.