Breaking News

भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर आणायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरुन शिवसेनेवर भाजप टीका करीत आहे. यामध्ये शेलारांनी ट्विटमध्ये म्हटले की, 105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला..कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला…ज्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत सत्तेत बसलात, तेव्हाच भगव्याचा रंग तुम्हीच फिका केलात, भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात असे त्यांनी सांगितले.

तसेच भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील, गुढीला शुध्द भगव्याची झालर चढवतील..!, तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा, मुंबईकरांना चँलेज देताय पण मुंबईकरच आता करुन दाखवतील असा चिमटा आशिष शेलारांनी शिवसेनेला काढला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply