नागोठणे ः प्रतिनिधी
येथील श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेमध्ये नव्याने ठेवण्यात आलेल्या कायम ठेवीच्या रकमेवर त्या रकमेएवढाच विमा देण्याची नावीन्यपूर्ण योजना संस्थेमार्फत ठेवीदारांसाठी देण्यात येत आहे. त्या योजनेच्या पहिल्या ठेवीदार अरुणा मोरे यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन व सचिव संजय काकडे यांच्या हस्ते विमा प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
या वेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी नीलिमा राजे, संस्थेचे संचालक शैलेश रावकर, व्यवस्थापक सुनील नावले व प्रकाश आरेकर उपस्थित होते. संस्थेचे सुनील नावले यांनी या योजनेचे ठेवीदारांनी स्वागत केले असून त्याला ते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.