उरण : रामप्रहर वृत्त – आर्थिकदृष्ट्या बॅटरीवर चालणारी सायकल मित्राला घेणे परवडत नसल्याने येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्या मित्रांनी साहित्य जमा करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनविली. ही सायकल अवघ्या दोन रुपयांत 25 किलोमीटर अंतर पार करते.
आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शिक्षणही बंद आहे. उरणमधील श्रेयस, शुभम व प्रथमेश या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्या मित्रांनी आपल्या मित्रासाठी इ-सायकल तयार करण्याचा निर्णय घेतला. मित्राला बॅटरीवरील सायकल घेयाची होती, मात्र तिची बाजारात किंमत 40 हजार इतकी होती. त्यामुळे या मित्रांनी स्वत: ती सायकल बनविण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक साहित्य गोळा करीत त्यांनी ही सायकल बनविली. ती अवघ्या दोन रुपयांच्या विजेमध्ये 25 किलोमीटर अंतर पार करते, असे श्रेयस वैवडे याने सांगितले. तर सायकलचा वेग हा 40 किलोमीटपर्यंत वाढू शकतो असे तो म्हणाला.
या सायकलला ओझोन असे नाव त्यांनी टेवले आहे. या तरुणांनी सुटीत आणखीही काही यंत्रांचा शोध लावला आहे. त्यात विहीर साफ करणारे यंत्र व बॅकअप बॅटरीही बनविली आहे.