Breaking News

यूपीत नवी फिल्मसिटी उभारणार : सीएम योगी

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे काम आम्ही करीत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधीकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली.
 या वेळी आदित्यनाथ यांनी शिवसेनेकडून झालेल्या टीकेवर बोलताना स्पष्ट केले की, कुणीही काहीही हिसकावून घेत नाहीयेत. सगळी खुली स्पर्धा आहे. कोण चांगल्या सुविधा देणार यावर सगळे निर्भर आहे. मुंबईतील फिल्म सिटी जशी आहे, तशीच राहणार आहे. तशीच काम करीत राहणार. आम्ही नव्या वातावरणानुसार, नव्या गरजांनुसार उत्तर प्रदेशात नवीन फिल्म सिटी उभी करणार आहोत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply