Breaking News

उरण नगर परिषद विषय समिती सभापती, सदस्यांची निवड

उरण ः वार्ताहर

उरण नगर परिषद विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड उरण नगर परिषद सभागृहात मंगळवारी (दि. 15) मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काम पाहिले. स्थायी समिती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम समिती पदसिद्ध सभापती जयेंद्र कोळी; शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती रवी भोईर, स्वच्छता, वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती गॅस यास्मिन मुहम्मद फाईक, पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती सभापती राजेश ठाकूर, नियोजन व विकास समिती सभापती मेराज शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती स्नेहल कासारे, उपसभापती प्रियंका पाटील व समिती सदस्यांची निवड करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, शिक्षण सभापती रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, राजेश ठाकूर, मेराज शेख, धनंजय कवडे, नंदकुमार लांबे, नगरसेविका स्नेहल कासारे, आशा शेलार, दमयंती म्हात्रे, प्रियंका पाटील, रजनी कोळी, जान्हवी पंडित, जसिम गॅस, भाजप उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, विनोद रूपचंदाणी, मनोहर सहतीया, रोहन भोईर, सर्जील कादरी तसेच उरण नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply